"भित्ती बदलल्या पण जातीयता तिच….!
Prashant Vikas Karale
MA 1st Year,Department Of Social Work ,Delhi University,Delhi -110007
Date:31 May, 2017
Mob.no-8390493444
Mail id-prashantkarale008@gmail.com
मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यामध्ये मंगरूळ नावाचे गाव .लोकसंख्या ही जेमतेम २४७८(1) .एकूण ५३४ घरे मराठा जातीचे वर्चस्व आणि प्रगत बागायतदारांचे गाव म्हणून या गावाची तालुक्यामधें ओळख .इथल्या शेतजमिनी हा मराठा समाजाच्या मालकीच्या.१९९३ मध्ये मंगरूळ आणि आजूबाजूच्या ५२ गावांमध्ये झालेल्या भूकंपामुळे वित्त आणि मनुष्य हानी खूप मोठ्या प्रमाणात झालेली त्यानंतर या गावाचे काही वर्षात पुनर्वसन झाले.पुनर्वसनानंतर ५२७०० हेक्टर मध्ये वसलेले गाव पारंपरिक वाडा पद्धतीचे घरे लोप पाऊण सिमेंटचे घरे वसलेली.गावामध्ये प्राथमिक गरजा या गरजेपुरत्या आहेत परंतु गावामधील दलित वस्ती गावाबाहेर वसलेली.२९८ दलित बांधवांची वस्ती यामध्ये १५८ पुरुष आणि १४० महिला यांचा समावेश.परंतु ,एकाकडेही हक्काने कसण्यासाठी आणि उपजीविकेचे साधन म्हणून शेतजमीन नाही.सर्व महार आणि मातंग जातीचे लोक आपली उपजीविका ही शेतमजुरी आणि मोलमजुरी करून भागवतात. पुनर्वसनानंतर या गावातील दलित वस्तीचे पुनर्वसन गावाच्या पश्चिम दिशेला झालेले आणि अंतर कायम राहावे म्हणून मोठे अश्या खणी खोदलेल्या.याच पुनर्वसनामधें या वस्तीमध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे समाज मंदिर बांधण्यात आलेले.समाजमंदिर देखील गावाच्या बाहेर आणि वस्तीच्या रस्त्याच्या पलीकडे .समाजमंदिराला लागूनच वनीकरण विभागाचे संपुष्टात येत असलेले जंगल आणि गावाची स्मशानभूमी.गावाचे दलितवस्तीतील समाजमंदिर हे कायम स्वरूपाचे व्हावे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून याआधी अनेकदा ग्रामपंचायतीकडे निवेदने देण्यात आलेली परंतु ,कागदपत्रांची विल्हेवाट ग्रामांचायतीकडून करण्यात आलेली यामुळे पुराव्याचा अभाव कायमचा राहिलेला.आणि याच सर्व गोष्टींचा परिणाम दलितांच्या रोजीरोटीवरती बऱ्याचदा झालेला.ग्रामपंचायतीच्या सांगण्यानुसार हे समाजमंदिर वनविभागाच्या जागेवरती आणि एका ‘लिंबाला’(दावू) या गावातील शेतकऱ्याच्या जागेवरती तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेले आहे जर हे समाजमंदिर तात्पुरत्या स्वरूपाचे असेल तर विटा आणि सिमेंटने बांधकाम करून पक्के कसे काय आणि ग्रामपंचायतीकडून बसवाण्यात येणारा भलामोठा लाईट चा खांब या तात्पुरत्या ठिकाणी कायमस्वरूपी कसा बसवण्यात आला हा प्रश्न दलित बांधवांनां कायमचा पडलेला असतो.
"भाऊ ,कलेक्टर येऊन गेला आमदार येऊन गेला पण फकस्त आमच्यासोबत फोटू कडून जात्याती बघा आणि त्यानंतर त्यांचा काय बी पत्त्या नाही बगा" एक वयोवृद्ध माणूस दबक्या आवाजात सांगत होता.दिनांक २४ दिसंबर २०१६ रोजी वस्तीमध्ये यामध्ये बोलता बोलता समाजमंदिराचा विषय निघालेला.रात्री मग बैठक बोलावली आणि सर्व समाजबांधव समाजमंदिर आणि पाणी प्रश्नांवरती चर्चा करू लागले.दुसऱ्या दिवशी मनुस्मुती दहन दिवस होता आणि या बैठकीमध्येच परत एकदा निवेदन तयार करण्यात आले आणि सर्व दलित वस्तीमधील समाजबांधवांच्या आणि भगिनींच्या स्वाक्षऱ्या आणि अंगठे घेण्यात आले.दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबर २०१६ रोजी ग्रामपंचायतमध्ये निवेदन देण्याचा प्रस्थाव ठरला
"याआधी जे कायबी वाद झाल्याती ते समदी इसरा आणि नवायाने आपणं सम्दीजन जाऊन बोलून बघू काय होतंय ती" एक प्रौढ माणूस बोलून सभा संपली.
२५ डिसेंबर चा दिवस उजाडला आणि सगळी मंडळी सकाळी १० वाजता ग्रामपंचायतीसमोर जमली.थोड्या वेळामध्ये उपसरपंचाचे आगमन झाले आणि सर्वांना आत बोलाविण्यात आले.जागा मिळेल तिथे दलित बांधव कचरत कचरत बसलेले.काही वेळाने सरपंचबाईंचे आगमन झाले.गावाचे सरपंच आणि उपसरपंच हे दोघेही मराठा समाजाचे.बैठक सुरु झाली .सादर केलेल्या निवेदनाचे वाचन झाले आणि त्यानंतर पोचपावती म्हणून झेरॉक्स केलेल्या कागदावरती पहिल्यांदाच सही आणि शिक्के घेण्यात आले.बैठकीमध्येच उपसरपंचानी ,आमदारांनी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाला केलेल्या 'दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत' समाजमंदिरासाठी निधी मंजूर करावा या मागणीचे पत्र सर्वांना दाखवण्यात आले.दिनांक १६ डिसेंबर २०१५ रोजी पाठवलेले पत्र त्यानी जेमतेम एक वर्षांनी त्या दिवशी समाजबांधवाना दाखवले.पत्रवाचन झाले आणि परत एकदा आश्वासनांचा पाऊस आणि सांत्वन इत्यादी गोष्टींनी बैठक पार पडली "लवकरच झेड पी च्या निवडणुका येणार आहेत आणि आचार संहिता लागू होत असल्यामुळे समाजमंदिराचे बांधकाम करता येणार नाही आणि निधी इम्प्लिमेंट करता येणार नाही"असे सांगून बैठकीची सांगता करण्यात आली.तरुण दलित बांधवांकडे स्मार्ट फोन असल्याने सर्व बैठक मोबाईल मध्ये रेकॉर्ड करण्यात आली.जेणेकरून यापुढे पुरावे नष्ट करता येणार नाहीत.
मंगरूळ गावातील दलित वस्तीच्या समोर असलेला झेंड्याचा खांब काटेरी तारांनी गुंडाळला आहे हा खांब झेंड्याच्या आणि दलित समाजाच्या असुरक्षतेची साक्ष देतो,तुटलेल्या खिडक्या आणि बाजूला लिहिलेले 'जय भीम' समाजाची अवस्था सांगून जातो .गळके छत,फाटलेला पण तितक्याच डौलाने फडकत असलेला निळा झेंडा आजही वाट पाहत आहे एका नव्या सुरुवातीची "भाऊ ,या समाजमंदिरामुळं आपली लोक एकत्र तरी बसतील आणि एकजूट तरी होतील बगा " समाजमंदिराची फोटो काढत असताना सांगणाऱ्या आजीबाई पूर्वीपासून चालत आलेल्या कुचंबणेचे आठवण करून देत होत्या .
गावामधील गोरोबा मांग आजही सायंकाळी गावातल्या मंदिरासमोर हलगी वाजवतो आणि घरोघरी जाऊन शिळ्या भाकरीचे तुकडे मागतो आणि समाजातील विषमतेचे आणि उच्च-निचतेची साक्ष देतो."मराठ्याची मानस मेली तर महाराचा माणूसच लाकडं फोडायला यावा लागतो बगा" असे सांगून वर्षानुवर्ष चालत आलेल्या गुलामगिरीची साक्ष तो माणूस देत होता.आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे 'दलित वस्ती सुधारणा योनेसारख्या' योजनांची अंमलबजावणी आणि १५ लाखांचा निधी पाणीप्रश्न आणि समाजमंदिर बांधकामासाठी वापरण्यात यावा.जिल्हा परिषेदेचे निवडणुका होऊन महिने उलटले तरी ही प्रतीक्षा कायमचीच राहील कि काय हा प्रश्न सतत दलित बांधवाना सतावत असतो "भाऊ भूकंपाआधीच्या कुडाच्या भित्ती जाऊन आता सिमेंटच्या भित्ती आल्या तरी तेच हाल बगा" पाणावलेले डोळे घेऊन आजीमाई दलित बांधव मंदिरामुळे समाज बांधव आत्मविश्वासाची पायरी चढतील या अपेक्षेत होत्या .
Referance:(1) CENSUS OF INDIA 2011,MAHARASHTRA SERIES-28 PART XII – B DISTRICT CENSUS HANDBOOK
LATUR
VILLAGE AND TOWN WISE
PRIMARY CENSUS ABSTRACT (PCA)
Directorate of Census Operations
MAHARASHTRA